कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

By Admin | Updated: July 24, 2016 01:34 IST2016-07-24T01:34:02+5:302016-07-24T01:34:02+5:30

जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी

Workers should work | कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

जि. प., न. प. निवडणुकीबाबत : अनिल देशमुख यांचे आवाहन; राकाँची आढावा बैठक
गडचिरोली : जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन व मोर्चेबांधणीच्या कामाला लागावे, असे आवाहन राकाँचे गडचिरोली जिल्हा प्रभारी तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
शनिवारी येथील राकाँच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, माजी आ. हरिराम वरखडे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, जि. प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, राकाँच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, राविकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, राकाँच्या जिल्हा कार्यकारिणींने प्रत्येक तालुक्यात शहर कार्यकारिणी गठित करावी, तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यांची आॅनलाईन नोंदणी करावी, असे ते म्हणाले. भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाची जनधन योजना पूर्णत: फसली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे राकाँ कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचवावी, असे यावेळी म्हणाले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गडचिरोली नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. हेमंत अप्पलवार, संचालन रवींद्र वासेकर यांनी केले तर आभार अरूण हरडे यांनी मानले.
बैठकीला रायुकाँचे जिल्हाध्यक्ष प्रा. रिंकू पापडकर, संजय निखारे, युनुस शेख, जयंत येलमुले, अविनाश वरगंटीवार, श्यामसुंदर उराडे, नितीन वडेट्टीवार, रामचंद्र वाढई आदीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Workers should work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.