कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा आत्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:38 IST2016-04-11T01:38:59+5:302016-04-11T01:38:59+5:30
भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, ...

कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा आत्मा
अशोक नेते यांचे प्रतिपादन : अहेरीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
अहेरी : भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी केले.
अहेरी येथे शनिवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, विनोद आकनपल्लीवार, तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे ते भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. अहेरी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण खासदार या नात्याने सदैव प्रयत्न करू, असेही ते यावेळी म्हणाले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आतापासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नगरसेवक श्रीनिवास चटारे, गिरीश मद्देर्लावार, नगसेविका मालू तोडसाम, रमेश समुद्रालवार, सतीश गोटमवार, रहिमा सिध्दीकी, साईनाथ औटकर, सुकमल हलदार, पोशालू सुदरी, संजय अलोणे, शारदा नैताम, सुरेश गंगाधीरवार, माया बिटपल्लीवार, पौर्णिमा नामेवार, संजय धुर्वे, विवेक सरदार, महेश मेकर्तीवार हजर होते.