शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वैरागड किल्ल्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:38 AM

आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाची उदासीनता : सौंदर्यीकरण व दुरूस्तीच्या कामाला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम करणारे कारागिर स्वगावी राजस्थानात होळी सणानिमित्त परतल्याने पुन्हा काम लांबणीवर जाण्याची शक्यता वैरागडवासीय व्यक्त करीत आहेत.वैरागड येथे विराट राजाचा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाची मागणी गाववासीयांकडून होत असताना भारतीय पुरातत्त्व विभागाने या मान्यता दिली. चंद्रपूर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने मागील चार वर्षांपासून किल्ल्याच्या सौंदर्यीकरणास सुरूवात झाली. पहिल्यावर्षी किल्ल्यावरील झाडे-झुडपे तोडणे व किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेसाठी काही सामाजिक संस्थासुद्धा या कामी लागल्या. त्यानंतर बाहेर राज्यातून कारागिर बोलाविण्यात आले. या कामाला सुरूवात झाली. सध्या केवळ २५ टक्केच काम झाले आहे. विशेष म्हणजे केवळ गेटचेच काम झाल्याचे दिसून येते.चार वर्षांत किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु बाहेरून कारागिर बोलाविले जातात. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील यंत्रणा त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवत असल्याने दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.किल्ल्याच्या कामासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तो कामावर खर्चसुद्धा केला जात आहे. परंतु कामाला गती मिळताना दिसून येत नाही. किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम करणारे कारागिर राजस्थानातील असल्याने ते यंदाची होळी व रंगपंचमी साजरी करण्याकरिता स्वगावी परतले. विशेष म्हणजे ते केवळ सहा महिने काम करतात. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने ते एवढ्यात तरी परत येतील, याची शाश्वती कमी असल्याचे गावातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे. वैरागड येथे अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची मागणी होत असतानाच किल्ल्याचे काम संथगतीने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वैरागड येथील अन्य ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा विकास केव्हा होईल, अशी शंका या भागातील नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विविध आकारांच्या विहिरीवैरागडच्या ऐतिहासिक किल्ल्याला १८ बुरूजे आहेत. प्रत्येक बुरूज विशिष्ट अंतरावर उभा आहे. किल्ल्याच्या आतील भागात ८ विहिरी आहेत. परंतु प्रत्येक विहीर त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षट्कोन, अष्टकोन , पूर्णगोल यासारख्या आकारात आहे. विहिरी ३२, ३५, ४० फूट खोल असल्याचे दिसून येतात. या विहिरींच्या बांधकामावरून त्या काळातील विहीर बांधकाम कला दिसून येते. या विहिरीच्या परिसरातील संपूर्ण कचरा काढण्यात आलेला आहे. तसेच संपूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Fortगड