राजकीय दबावात न येता पारदर्शकपणे कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:08+5:302021-07-21T04:25:08+5:30
अहेरी पंचायत समितीच्या बिरसा मुंडा सभागृहात मंगळवारी झालेल्या आढावा सभेत अध्यक्ष म्हणून धर्मरावबाबा आत्राम बाेलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे ...

राजकीय दबावात न येता पारदर्शकपणे कामे करा
अहेरी पंचायत समितीच्या बिरसा मुंडा सभागृहात मंगळवारी झालेल्या आढावा सभेत अध्यक्ष म्हणून धर्मरावबाबा आत्राम बाेलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, साहाय्यक गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार, माजी नगरसेवक अमोल मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी महिला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम आदी उपस्थित होते.
आढावा सभेत सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता पी. एम. इंगोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडदे, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, पशुधन विकास अधिकारी डॉ. पवन पावडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अमोल रामटेके आदी उपस्थित होते.
सभेचे संचालन संजीव कोठारी यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी मानले. या वेळी सर्व ग्रामसेवक पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
(बॉक्स)
या विभागांनी सादर केली माहिती
आढावा सभेत १४ वा वित्त आयोग आणि १५ वा वित्त आयोगातील विविध योजनांच्या संबंधाने माहिती देण्यात आली. तसेच घरकूल विभाग, स्वच्छ भारत मिशन विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, रोजगार हमी योजना, लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, पशुधन विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा सर्वच विभागांनी झालेल्या कामांचा आढावा सभेत सादर केला.