रोहयो मजुराच्या आधार सिडिंगचे काम ९१ टक्के

By Admin | Updated: March 28, 2016 01:30 IST2016-03-28T01:30:29+5:302016-03-28T01:30:29+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आतापर्यंत एकूण २ लाख

The work of supporting the ROHS is 91% | रोहयो मजुराच्या आधार सिडिंगचे काम ९१ टक्के

रोहयो मजुराच्या आधार सिडिंगचे काम ९१ टक्के

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आतापर्यंत एकूण २ लाख ५० हजार ३१२ मजुरांनी रोहयोच्या कामासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी २ लाख २९ हजार ९६२ मजुरांची आधार कार्ड सिडिंग झाली असून या कामाची टक्केवारी ९१.८७ आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील रोहयो मजुरांच्या आधार सिडिंगचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुराची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यासाठी मजुरांच्या बँक खात्याला आधार कार्ड क्रमांकची सिडिंग करणे अत्यावश्यक आहे. नरेगा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तत्काळ रोहयो मजुराची आधार कार्ड सिडिंग करण्यासाठी सांगितले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ६९३ मजुरांच्या आधार सिडिंगची पडताळणी नरेगा विभागाच्या वतीने सुरू आहे. बँक खात्यात चुका असल्यामुळे तसेच अनेक मजुरांचे आधार सिडिंग झाले नसल्यामुळे नरेगा विभागाला मजुरांची मजुरी अदा करण्यास अडचण निर्माण होते. यासाठीच मजुरांच्या बँक खात्यांशी आधार कार्ड सिडिंग करण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या तुलनेत अहमदनगर, बिड, हिंगोली, जालना, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सोलापूर व ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये आधार सिडिंगचे प्रमाण कमी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

नरेगा विभागाच्या दिमतीस ३२ मशीन
४गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाकडे रोहयो मजुरांचे आधार सिडिंग करण्यासाठी ३२ मशीन उपलब्ध आहेत. या मशीनच्या आधारे प्रत्येक तालुक्यात आधार सिडिंगचे शिबिर लावले जात आहेत.

मजुराच्या आधार सिडिंगचा तपशील
तालुकाआॅनलाईन नोंदणीआधार सिडिंगटक्केवारी
अहेरी१४,२४६१२,५४७८८.३५
आरमोरी३२,४६१३०,०७८९२.६६
भामरागड७,३३९६,०१४८१.९५
देसाईगंज१७,१६११७,०६७९९.४५
चामोर्शी३४,५५२३३,३४८९६.४९
धानोरा३०,१२४२८,०११९२.९९
एटापल्ली१३,६३८११,७७८८६.३
गडचिरोली२९,००९२५,९००८९.२८
कोरची१८,६७५१६,९२६९०.६३
कुरखेडा३१,५०९२८,५५५९०.६२
मुलचेरा९,८३६९,७०७९८.६९
सिरोंचा११,७५२१०,००१८५.१
एकूण २,५०,३१२२,२९,९७२९१.८७

Web Title: The work of supporting the ROHS is 91%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.