पर्लकोटावरील पुलाचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:37+5:30

भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने ड्रिलिंग मशीनने माती परीक्षणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे भामरागडवासीयांच्या पुलाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भामरागड तालुकास्थळाला लागून पर्लकोटा नदी आहे.

The work on the Pearlkota Bridge will begin | पर्लकोटावरील पुलाचे काम सुरू होणार

पर्लकोटावरील पुलाचे काम सुरू होणार

ठळक मुद्देमाती परीक्षण सुरू : भामरागड तालुक्यातील वाहतुकीची समस्या सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने ड्रिलिंग मशीनने माती परीक्षणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे भामरागडवासीयांच्या पुलाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भामरागड तालुकास्थळाला लागून पर्लकोटा नदी आहे. या नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी राहत असल्याने संपूर्ण तालुक्याचा संपर्क तुटते. त्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी होत होती. यासाठी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने ८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कंत्राटदाराने काम सुरू करण्याच्या उद्देशाने नदी पात्रातील माती परीक्षणाला सुरूवात केली आहे. ड्रिल मशीनच्या सहाय्याने माती परीक्षण केले जात आहे. पर्लकोटा नदीवर उंच पूल झाल्यास संपूर्ण भामरागड तालुक्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

वन विभागाचा आक्षेप
पर्लकोटा नदी वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने नदी पात्रात कोणतेही काम करण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने परवानगी घेतली नाही. ड्रिलिंगचे काम केले जात असल्याचे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर शनिवारी दुपारनंतर काम बंद पाडले. अर्ज केल्यानंतर कामाला परवानगी दिली जाईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The work on the Pearlkota Bridge will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.