कोसरी प्रकल्पाचे काम झाले ठप्प
By Admin | Updated: July 27, 2016 01:55 IST2016-07-27T01:55:02+5:302016-07-27T01:55:02+5:30
आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाचे काम आता पूर्णत: ठप्प झाले आहे.

कोसरी प्रकल्पाचे काम झाले ठप्प
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाचे काम आता पूर्णत: ठप्प झाले आहे. राज्य सरकारचे हा प्रकल्प पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाला २४ आॅगस्ट २००९ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १६.४६ कोटी रूपये या प्रकल्पाची किमत त्यावेळी होती. सध्या या प्रकल्पाची अद्यावत किंमत २४.४६ कोटी पोहोचली आहे. मार्च २०१४ पर्यंत या प्रकल्पावर १३.९३ कोटी रूपयाचा खर्च झाला आहे. १ एप्रिल २०१४ अखेर २.५३ कोटी रूपये उर्वरित किंमत असल्याचे चंद्रपूर पाठबंधारे प्रकल्प मंडळाने म्हटले आहे. या प्रकल्पामुळे ४७५ हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण होत आले असून चव्हेला गावाचे पुनर्वसनाचे काम शिल्लक राहिले आहे. जून २०१७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मात्र सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे पूर्ण काम ठप्प असून चव्हेलाचे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील तिढा सुटलेला नाही. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यावरून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे काम पूर्णपणे बंद आहे. (वार्ताहर)