समाजासाठी होमगार्डचे कार्य

By Admin | Updated: December 10, 2015 01:50 IST2015-12-10T01:50:07+5:302015-12-10T01:50:07+5:30

कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात.

Work of Home Guards for the community | समाजासाठी होमगार्डचे कार्य

समाजासाठी होमगार्डचे कार्य

आरमोरी : कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात. त्यांचे कार्य पोलीस व समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक मंजुनाथ सिंगे यांनी केले.
होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ६९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बुधवारी आरमोरी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमाला कुरखेडाचे एसडीपीओ अभिजीत फसके, संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, ठाणेदार सुभाष ढवळे, काशिनाथ शेबे, काकपुरे, निमजे, श्रीनिवास आंबटवार, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, वेणू ढवगाये, सहीम मिर्झा, मुत्तेमवार, अनिल सोमनकर, राजू वंजारी, मनोज गजभिये उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त होमगार्ड पुष्पा खोब्रागडे, सुनीता पगाडे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. संचालन दौलत धोटे तर आभार पेशट्टीवार यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Work of Home Guards for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.