नगर परिषदेचे कामकाज ठप्प

By Admin | Updated: July 16, 2014 00:11 IST2014-07-16T00:11:40+5:302014-07-16T00:11:40+5:30

आपल्या मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.

The work of the city council jam | नगर परिषदेचे कामकाज ठप्प

नगर परिषदेचे कामकाज ठप्प

अत्यावश्यक सेवा सुरू : कर्मचारी बेमुदत संपावर
गडचिरोली : आपल्या मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शासनाने द्यावे, सन २००० पूर्वी कार्यरत असेल्या सर्व रोजंदारी, कंत्राटी, अनियमित, हंगामी मानधनावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अनुकंपधारकांच्या तत्काळ नियुक्ती कराव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी शासनाने अनुदान द्यावे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून द्यावी, शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती द्यावी, प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ५ हजार ते ८ हजार ही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, ५० टक्के मुख्याधिकाऱ्यांचे पदे नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा, १२ वर्षानंतर कालबध्द पदोन्नती व २४ वर्षानंतर दुसरी पदोन्नती लागू करावी आदी १९ प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यभरातील नगर परिषदेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. गडचिरोली नगर परिषदेतीलही एकूण ८९ कर्मचाऱ्यांपैकी ३८ कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र आरोग्य, साफसफाई, अग्नीशामक, पाणी पुरवठा आदी अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत. आंदोलनाचे नेतृत्व एस. डी. भांडेकर, डी. डी. संतोषवार, आर. व्ही. धकाते, भी. म. शेंडे, के. डब्ल्यू उईके, सी. के. दुधे, जी. टी. मैंद, के. एम. बाळेकरमकर, एस. पी. भरटकर, व्ही. डब्ल्यू भांडेकर, एम. एन. रायपुरे, डी. व्ही. नैताम, एस. एम. निकोडे, डी. ए. मेश्राम, एस. व्ही. मार्तिवार, बी. बी. शेख यांनी केले.
संघटनेचे पदाधिकारी शासनासोबत चर्चा करीत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास संप आणखी काही काळ चालणार आहे.

Web Title: The work of the city council jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.