चामाेर्शी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:29 PM2021-03-07T23:29:59+5:302021-03-07T23:30:36+5:30

गडचिराेली-चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ एक वर्षापूर्वी करण्यात आला. शहरातून एक बाजू पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे कामच केले नाही. मागील दहा महिन्यांपासून एकाच बाजूने शहरातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रचंड धूळ व वाहतूक काेंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत काही राजकीय पक्षांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर २० दिवसांपूर्वी खाेदकामाला सुरूवात केली.

Work on the Chamarshi highway stalled again in a partial state | चामाेर्शी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प

चामाेर्शी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्दे२० दिवसांपासून काम जैसे थे; रस्ता ओलांडून जाणाऱ्यांची कसरत

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर गडचिराेली शहरातून चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरूवात करण्यात आली हाेती. यासाठी २० दिवसांपूर्वी रस्ता खाेदून ठेवण्यात आला आहे. मात्र त्यानंतर काम ठप्प पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. 
गडचिराेली-चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ एक वर्षापूर्वी करण्यात आला. शहरातून एक बाजू पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे कामच केले नाही. मागील दहा महिन्यांपासून एकाच बाजूने शहरातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रचंड धूळ व वाहतूक काेंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत काही राजकीय पक्षांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर २० दिवसांपूर्वी खाेदकामाला सुरूवात केली. खाेदकामाला सुरूवात झाल्यानंतर मार्ग हाेईल अशी अपेक्षा हाेती. मात्र आता २० दिवसांचा कालावधी उलटूनही खाेदलेला मार्ग मुरूमाने भरण्यात आला नाही. मार्ग
जवळपास चार फुट खाेल खाेदून ठेवण्यात आला आहे. पलिकडे शेकडाे नागरिकांची घरे आहेत. मार्ग खाेदून ठेवला असल्याने वाहने नेणे कठीण झाले आहे. वाहन रस्त्यावर ठेवून घरी जावे लागत आहे. काही नागरिक तर दुसऱ्याच्या घरी वाहने ठेवत आहेत. एका बाजूचा मार्ग झाला आहे. तर दुसरी बाजू खाेदण्यात आली आहे. एखादे भरधाव वेगातील वाहन थाेडे जरी बाजूला गेले तरी ते उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाऊस आल्यास चिखल हाेण्याची शक्यता आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. काम सुरू करायचेच नव्हते तर खाेदकाम का करण्यात आले असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

नियाेजनाचा अभाव
कंत्राटदाराच्या नियाेजन शुन्य कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नागरिकांमध्ये राेष व्यक्त हाेत आहे. याचा एक दिवस भडका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणची आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष हाेत असल्याने कंत्राटदाराची मनमानी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Work on the Chamarshi highway stalled again in a partial state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.