शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ कार्यालयांचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST

गडचिरोली : महसूल विभागाच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात ४० मंडळ कार्यालयाची उभारणी दीड कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. काही ठिकाणी ...

गडचिरोली : महसूल विभागाच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात ४० मंडळ कार्यालयाची उभारणी दीड कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. काही ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहे. तर काहींची कामे पूर्ण झाली आहेत.

स्रेहनगरातील वाॅर्डांमध्ये कचराकुंड्या लावा

गडचिरोली : शहरातील स्रेहनगरात कचराकुंडीचा अभाव असल्याने परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. न. प. ने सदर समस्येकडे लक्ष देऊन स्रेहनगरात कचरा कुंड्या लावण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले

गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.

आरमोरीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

आरमोरी : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ग्रा. प. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास होत असल्याने सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

विभागीय शिक्षण मंडळ गडचिरोलीत द्या

गडचिरोली : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून गडचिरोली येथे नवे शिक्षण मंडळ सुरू करण्यात यावी. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेले स्वतंत्र शिक्षण मंडळ देण्यात यावे व त्याचे मुख्यालय गडचिरोली ठेवण्यात यावे.

डाक विभागाचे मुख्य कार्यालय गडचिरोलीत द्या

गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे प्रधान कार्यालय गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी गडचिरोलीवासीयांची मागणी आहे.

आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा

आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रूंदी वाढविण्याची मागणी होत आहे.

खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री

चामोर्शी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सिरोंचा तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त

सिरोंचा : अतिदुर्गम भागात असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले.

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

कुरखेडा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात वेळेवर येणे गरजेचे असतांनाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वाट बघत टेबलाजवळ उभे राहावे लागते. विविध विभागात एकसारखी स्थिती असल्याने ग्रामीण भाागातून येणाऱ्या लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

अमिर्झा परिसरातील अनेक हातपंप नादुरुस्त

गडचिरोली : अमिर्झा परिसरातील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. सदर हातपंप दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या हातपंपांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.