देलनवाडीत ३३५ मजुरांना काम
By Admin | Updated: January 23, 2016 01:47 IST2016-01-23T01:47:49+5:302016-01-23T01:47:49+5:30
तालुक्यातील देलनवाडी परिसरात रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून या कामावर सुमारे ३३५ मजूर कामावर आहेत.

देलनवाडीत ३३५ मजुरांना काम
भातखाचर तयार करणे सुरू : रोहयो मजुरांना मिळाला दिलासा
आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी परिसरात रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून या कामावर सुमारे ३३५ मजूर कामावर आहेत.
देलनवाडी परिसरात मागील तीन वर्षांपासून रोहयो काम सुरू करण्यात आले नव्हते. यावर्षी या परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे रोहयो काम सुरू करण्याची मागणी मजुरांनी प्रशासनाकडे केली होती. रोहयो विभागाने याची दखल घेऊन रोहयोची कामे सुरू केली आहेत. सद्यस्थितीत या कामावर ३३५ मजूर कामावर आहेत. पुन्हा रोहयो मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहयोतून देलनवाडी येथे भातखाचर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम नानाजी सहारे, गोपाळा मडावी, गणपत कोवे यांच्या शेतात सुरू आहे. किमान एक महिना काम चालावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांच्याकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)