लाकडी कोळसा वाहून नेणारा ट्रक पलटला
By Admin | Updated: July 5, 2014 00:40 IST2014-07-05T00:40:16+5:302014-07-05T00:40:16+5:30
कुरखेडा वरून देसाईगंज कडे लाकडी कोळशाची वाहतूक करणारा ट्रक शंकरपूर पासून ...

लाकडी कोळसा वाहून नेणारा ट्रक पलटला
विसोरा : कुरखेडा वरून देसाईगंज कडे लाकडी कोळशाची वाहतूक करणारा ट्रक शंकरपूर पासून १ किमी अंतरावरील तलावाजवळ पलटला. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
ए. पी. २९ टीए ८२२९ क्रमांकाचा ट्रक लाकडी कोळसा घेऊन कुरखेडावरून देसाईगंकडे जात होता. दरम्यान ट्रक चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक तलावाजवळ पलटला. जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतुकीबाबत पोलीस प्रशासन फारसे गंभीर नाही. ओव्हरलोड करणाऱ्या वाहनावर पोलीस प्रशासन फारशी कारवाई करताना दिसून येत नाही. यामुळे जिल्हाभरात ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहनाला अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात अनेकदा ओव्हरलोड वाहनाचे अपघात घडले आहेत. (वार्ताहर)