अवैध दारूविक्रेत्याकडून महिलांची छेडछाड

By Admin | Updated: May 30, 2014 23:41 IST2014-05-30T23:41:37+5:302014-05-30T23:41:37+5:30

आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्‍या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या

Women's teasing by illegal liquor seller | अवैध दारूविक्रेत्याकडून महिलांची छेडछाड

अवैध दारूविक्रेत्याकडून महिलांची छेडछाड

आरमोरी : आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्‍या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना २७ मे २0१४ महिलांनी लेखी निवेदन सादर केले आहे. अवैध दारूविक्री व्यवसायाला आळा घालण्यात यावा, अन्यथा व्यवसायिकाची नागरिक धिंड काढतील, असा इशारा देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार दूरसंचार टॉवरवस्ती तसेच वॉर्ड क्र. ५ व २ मध्ये अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. या व्यवसायावर नियंत्रण घालण्यात यावे, यासाठी नागरिक व महिलांनी पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली. परंतु पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली नाही. शिवाय दारू व्यवसायिकांकडून त्यानंतर वार्डातील महिलांची छेड काढणे, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणे किंवा गैरवर्तवणूक करून महिलांना जेरीस आणणे असे प्रकार सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेकदा दारू पिऊन निघणारे लोक गावाजवळच्या सार्वजनिक विहिरीवर येऊन लघवी करतात, उलट्या करतात, महिलांकडे वाईट नजरेने पाहतांना दिसून येत आहे. भरदिवसा दारूची वाहतूक होत आहे. दारूची वाहने खुलेआमपणे उभे ठेवून दारूच्या पेट्याही उतरविल्या जात आहे, अशा प्रकारावर पोलिसांनी नियंत्रण न आणल्यास संबंधीत व्यक्तीची गावकर्‍यांच्या मदतीने धिंड काढण्यात येईल व होणार्‍या बेकायदेशिर कारवाईला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनातून नागरिकांनी दिला आहे. पोलिसांनी सामाजिक बांधिलकेच्या दृष्टीकोनातून तत्काळ अवैधधंद्यावर आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's teasing by illegal liquor seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.