महिलांचे हक्क व कायदेविषयक जनजागृती करणार
By Admin | Updated: December 2, 2015 01:34 IST2015-12-02T01:34:03+5:302015-12-02T01:34:03+5:30
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व क्रांतिज्योती महिला संघटना व अपंग संघनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्त्री हिंसाविरोधी पंधरवडा अभियानाचे आयोजन ...

महिलांचे हक्क व कायदेविषयक जनजागृती करणार
पत्रकार परिषद : शुभदा देशमुख यांची माहिती
गडचिरोली : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व क्रांतिज्योती महिला संघटना व अपंग संघनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्त्री हिंसाविरोधी पंधरवडा अभियानाचे आयोजन २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान महिलांवरील अत्याचार, महिलांचे हक्क, अधिकार व महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या संस्थापक सदस्य शुभदा देशमुख यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या १५ दिवसांच्या कालावधीत कुरखेडा, कोरची व आरमोरी तालुक्यात ग्रामसभांना महिलांच्या हक्काबाबत असलेल्या कायद्याविषयक जनजागृतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने कुरखेडा व कोरची तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पुराडा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सर्व गावातील तंटामुक्त समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परिचारिकांनाही महिला अत्याचार विरोधी जनजागृतीपर प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही शुभदा देशमुख यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला दीनकर चंदनखेडे, नूतन लाऊतकर, राजकुमारी जमकातन, मारकबोडीच्या सरपंच रवीना रोहणकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)