चांदाळा येथे महिला मेळावा

By Admin | Updated: January 11, 2016 01:28 IST2016-01-11T01:28:15+5:302016-01-11T01:28:15+5:30

चांदाळा ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, स्व. वि. दा. सावरकर आश्रमशाळा,

Women's Meet at Chandala | चांदाळा येथे महिला मेळावा

चांदाळा येथे महिला मेळावा

मार्गदर्शन : महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
गडचिरोली : चांदाळा ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, स्व. वि. दा. सावरकर आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन वंदना मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी हेमंत जंबेवार होते. विशेष अतिथी म्हणून देसाईगंजच्या सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, वैशाली रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य अनिल बांबोळे, गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी पचारे, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पर्यवेक्षिक ठाकरे, चांदाळाचे सरपंच राजेंद्र मेश्राम, उपसरपंच शालू गेडाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश बांबोळे, पोलीस पाटील धानिका मेश्राम, डॉ. गजानन बुरांडे, मुकेश डोंगरे, मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, ग्रा. पं. सदस्य शानंदा कोराम, उषा गावळे, वंदना तोरे, यादव गोमस्कर, श्यामसुंदर मुळे आदी उपस्थित होते.
महिलांसाठी कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची, रस्सीखेच आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक सुरेश बांबोळे, संचालन प्रभाकर साखरे तर आभार शंकरवार यांनी मानले.

Web Title: Women's Meet at Chandala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.