महिला दारूबंदी समितीने पकडली दारू
By Admin | Updated: January 24, 2017 01:57 IST2017-01-24T01:57:49+5:302017-01-24T01:57:49+5:30
कोरची तालुका दारूबंदी समितीच्या महिलांनी पुढाकार घेऊन सोमवारी कोरची शहरात धाड टाकून तीन दारू

महिला दारूबंदी समितीने पकडली दारू
तीन दारू विक्रेत्यांकडून १३४ बॉटल जप्त
कोरची : कोरची तालुका दारूबंदी समितीच्या महिलांनी पुढाकार घेऊन सोमवारी कोरची शहरात धाड टाकून तीन दारू विक्रेत्यांकडून जवळपास २० हजार रूपये किमतीची विदेशी तसेच मोहफुलाची मिळून एकूण १३४ बॉटल दारू जप्त केली.
कोरची शहरात समितीच्या महिलांनी मोहीम राबवून अवैध धंदे बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर तपासणी केली असता, निर्मल धमगाय हिच्याकडे विदेशी दारूच्या एकूण १३४ बॉटला आढळून आल्या. महिलांनी सदर १८ हजार ४४९ रूपयांची दारू जप्त करून पंचनामा केला. करीवया नैताम व चरण बोगा यांच्या घरून मोहफुलाची तसेच गयाबाई बागडे, सुगंधा बागडे, पांचोबाई यांच्याकडूनही दारू जप्त केली. सदर कारवाई समितीच्या सदस्य फुलबाई कलियारी, बिरमबाई जमकातम, रमीत बागडेरीया, बासन गंधेल, गंगाबाई कपुरडेरीया, सोनकुकरा, मेश्राम यांनी केली.