दारूविरोधात महिलांचा एल्गार

By Admin | Updated: December 11, 2014 23:07 IST2014-12-11T23:07:33+5:302014-12-11T23:07:33+5:30

परिसरात खुलेआम दारूविक्री केली जात असून त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. परिसरातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती

Women's Elgar Against Drugs | दारूविरोधात महिलांचा एल्गार

दारूविरोधात महिलांचा एल्गार

दारूविक्री बंद करण्याची मागणी : एसडीओ कार्यालयावर दिली धडक
अहेरी : परिसरात खुलेआम दारूविक्री केली जात असून त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. परिसरातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.
शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली असली तरी ही दारूबंदी केवळ नावापुरताच मर्यादित झाली आहे. अहेरी परिसरातील प्रत्येक गावात खुलेआम दारू विकली जात आहे. गावातच दारू मिळत असल्याने युवक व विद्यार्थी दारूच्या आहारी जात आहेत. दिवसभर केलेल्या कामाचे पैसे दारूच्या व्यसनात जात आहेत. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दारूविक्रीचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एसडीओ कार्यालयावर धडक दिली. यावेळी एसडीओ कार्यालयात तहसीलदार गालापल्लीवार उपस्थित होते. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. सदर निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविले जाणार आहे. दारूविक्री अत्यंत घातक असल्याने दारूविक्री बंद करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन महिलांना दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's Elgar Against Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.