शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडात महिलांची सुरू आहे पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 6, 2015 01:38 IST

गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे.

वैरागड : गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे. गावातील २५ वर्षांपूर्वीची जुनी नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून गावात पाण्याची असमान वितरण होत आहे. परिणामी गावातील बेघर वस्तीतील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील हातपंपावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. वैरागड येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली जुनी नळ पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरी ठरत आहे. त्यामुळे सतत गेल्या १५ वर्षांपासून नागरिक व महिलांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची भीषण समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. मात्र नागरिकांच्या या निवेदनाची ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत भोयर यांच्या घराजवळ दीड लाख हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठ्याची नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले, मात्र वैरागडातील पाणी समस्या मार्गी लागली नाही. अपुऱ्या नळ पाणी पुरवठ्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना हातपंप, विहिर आदी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर स्त्रोतांचे अंतर दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने महिलांची पाण्यासाठी सध्या पंचाईत होत आहे. (वार्ताहर)२६ जानेवारी २०१३ रोजी वैरागड येथे झालेल्या ग्रामसभेत नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या ठरावाच्या प्रती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे २०१४ च्या डिसेंबर महिन्यात पाठविल्या. या ठरावात अनेक त्रुट्या आढळून आल्याने पाणी पुरवठा विभागाने नव्या नळ योजनेचा प्रस्ताव ग्रा.पं. प्रशासनाकडे परत पाठविला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला असून याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे माहिती आहे.