महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:34 PM2019-01-28T22:34:21+5:302019-01-28T22:34:49+5:30

सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी समाजाने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.

Women should be self-supporting and self-reliant | महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे

महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे

googlenewsNext
ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष : स्त्री शक्तीचा जागर व मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी समाजाने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
स्थानिक श्रीराम विद्यालय तथा महाविद्यालयात गुरूवारी आयोजित स्त्री शक्तीचा जागर तथा आनंद मेळाव्यात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुधा नाकाडे होते. मार्गदर्शक म्हणून रचना गहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून संगीता निरगुडकर, मनीषा वऱ्हाडे, आशा बानबले, विमल फाये, वर्षा फाये, नगरसेविका नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, आशा तुलावी, शाहेदा मुघल, चित्रा गजभिये, अनिता बोरकर, विहिंपचे अध्यक्ष वामनराव फाये, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक नागेश फाये, प्राचार्य पी.डब्ल्यू.भरणे आदी उपस्थित होते.
यावेळी रचना गहाणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माधुरी बोरकर, ग्रामसेवक संघाच्या छाया ढवळे, मंजूळा मेश्राम, गीता शिवणकर, छाया दहिकर, माही मेश्राम आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रवीकांत मिश्रा, आभार भाऊ राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Women should be self-supporting and self-reliant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.