महिलांनी आर्थिकदृष्ट्या संक्षम व्हावे!
By Admin | Updated: March 9, 2017 01:38 IST2017-03-09T01:38:16+5:302017-03-09T01:38:16+5:30
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. स्त्रि ही शिक्षित होणे गरजेचे असून

महिलांनी आर्थिकदृष्ट्या संक्षम व्हावे!
सूर्यकांत शिंदे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन
गडचिरोली : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. स्त्रि ही शिक्षित होणे गरजेचे असून त्याशिवाय विविध योजनांचा तीला उपयोग करुन घेता येणार नाही. यातून ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज, असे प्रतिपादन गडचिरोलीचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यानी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात महिला मतदार जागृती अभियान कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा न्यायाधिश यू. एम. पदवाड, एस. पी. सुर, रेहपाडे, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, एस. राममूर्ती, डॉ विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, माविमच्या व्यवस्थापक कांता मिश्रा, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, सुनील चडगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना न्या. शिंदे म्हणाले, महिलांच्या न्याय हक्कासाठी कायदे आहेत. परंतु खऱ्या अर्थाने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय महिलांना समाजात ताठ मानेने जगता येणार नाही. तरी शासनाच्या सर्वंकष योजना तळागाळापर्यंत पोहचविणे हे शासकीय यंत्रणाची महत्त्वाची भूमिका आहे. असेही ते म्हणाले.
न्या. पदवाड, एसडीओ कौस्तुभ दिवेगावकर, कांता मिश्रा, माधुरी काटमांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. संचालन ज्योती तायडे यांनी तर आभार माधुरी आटमांडे यांनी मानले.
शासकीय योजनांची माहिती स्थानिक भाषेतून अवगत करणार- जिल्हाधिकारी
महिला ही सर्व क्षेत्रात आज अग्रेसर आहे. तीच्याकडे सन्मानाने समाजानी बघण्याचा हा दिवस असून तसा आपण संकल्प करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. गडचिरोली हा आदिवासीबहूल जिल्हा असून बहुसंख्य नागरिक गोंडी व माडीया भाषेत बोलतात. अशा नागरिकांना शासकीय योजनांची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत अवगत करून देण्यात येईल, असा प्रशासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.