इंधन दरवाढीविराेधात महिलांनी केला केंद्र शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:57+5:302021-03-13T05:05:57+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्या मनीषा दोनाडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महिला फेडरेशनच्या वसुधा कोपुलवार होत्या. ...

Women protest against fuel price hike | इंधन दरवाढीविराेधात महिलांनी केला केंद्र शासनाचा निषेध

इंधन दरवाढीविराेधात महिलांनी केला केंद्र शासनाचा निषेध

कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्या मनीषा दोनाडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महिला फेडरेशनच्या वसुधा कोपुलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. नर्गिस पठाण, सुप्रिया रेवतकर, नगरसेविका सिंधू कापकर उपस्थित हाेत्या. ॲड. पठाण यांनी महिलांचे कायदेविषयक अधिकार यावर मार्गदर्शन केले. तर सुप्रिया रेवतकर यांनी महिलांनी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी स्वयंरोजगार व सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन केले. कोरोना काळात कमी मानधन असतानाही पूर्णवेळ काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा सत्कार महिला दिनानिमित्त करण्यात आला. तसेच ‘मी सावित्रीबाई बोलते’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक सुनीता तागवान, द्वितीय क्रमांक विद्या चौधरी तर उत्तेजनार्थ मनीषा मस्के, ज्योती घोडमारे यांना रोख रक्कम व सावित्रीबाईंचे जीवन चरित्र पुस्तक भेट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण ज्योती वडपल्लीवर, रोशनी बैस, सविता पानसे यांनी केले. संचालन रोशनी झिमटे, प्रास्ताविक मीनाक्षी सेलोकर, तर आभार अनुराधा रामटेके यांनी मानले. यशस्वीतेसाठी भारतीय महिला फेडरेशन, युगंधरा महिला बचत गट, भारतीय महिला बचत गट व सुहासिनी महिला बचत गटांच्या महिलांनी सहकार्य केले.

Web Title: Women protest against fuel price hike