जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला मजूर जागीच ठार

By Admin | Updated: April 4, 2015 00:48 IST2015-04-04T00:48:57+5:302015-04-04T00:48:57+5:30

येथील निर्माणाधिन शासकीय इमारतीच्या बांधकामावर पाणी टाकत असताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन ..

Women laborers killed on the spot by touching the living power star | जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला मजूर जागीच ठार

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला मजूर जागीच ठार

कुरखेडातील घटना : इमारत बांधकाम पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
कुरखेडा : येथील निर्माणाधिन शासकीय इमारतीच्या बांधकामावर पाणी टाकत असताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कुरखेडा येथे घडली. देवलाबाई सुखीराम भैसा (३५) रा. जांभुळखेडा असे मृतक महिलेचे नाव आहे.
कुरखेडा येथील सती नदीच्या काठावर आरोग्य विभागाच्या वतीने कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामावर देवलाबाई भैसा ही महिला मजूर रोजंदारीने कामावर जात होती. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास निर्माणाधिन इमारतीच्या स्लॅबवर चढून देवलाबाई पाणी टाकत होती. दरम्यान इमारतीच्या वरून गेलेल्या जिवंत विद्युत तारेचा तीला स्पर्श झाला. जबर धक्का बसून देवलाबाई जागीच ठार झाली. देवलाबाईला एक १३ वर्षीय मुलगा आहे. नातेवाईकांच्या आश्रयाने ती जांभुळखेडा गावात राहत होती. या घटनेची नोंद कुरखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पर्यवेक्षक राजू भोयर याच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
आर्थिक मदत देण्यास कंत्राटदाराचा होकार
विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या देवलाबाई भैसा या महिला मजुराच्या १३ वर्षीय मुलाला आर्थिक मदत देण्याची कबुली या इमारत बांधकामाच्या कंत्राटदाराने सर्वासमक्ष चर्चेदरम्यान दिली.

Web Title: Women laborers killed on the spot by touching the living power star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.