महिलांनी पकडली २५ पेट्या दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:06 IST2018-04-04T23:06:26+5:302018-04-04T23:06:26+5:30
आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मुधोली चक नं. २ येथे बचतगटाच्या महिला सदस्यांनी २५ पेट्या दारू पकडली आहे.

महिलांनी पकडली २५ पेट्या दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मुधोली चक नं. २ येथे बचतगटाच्या महिला सदस्यांनी २५ पेट्या दारू पकडली आहे.
मुधोली चक नं. २ या गावासह परिसरात दारूचा पुरवठा केला जात असल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. बचतगटाच्या महिलांनी दारूविक्रेत्यास अनेकवेळा बजावून दारूची वाहतूक बंद करण्याची मागणी केली. मात्र दारूविक्रेत्यांनी दारूची विक्री सुरूच ठेवली. बचतगटाच्या महिलांनी सापळा रचून सुमारे २५ पेट्या दारू जप्त केली. एका ठिकाणावरून २१ पेट्या दारू व दुसऱ्या ठिकाणावरून चार पेट्या दारू मिळाली. या दारूच्या पेट्यांमध्ये १ हजार २०० निपा दारू आढळली. त्याची किंमत १ लाख २० हजार रूपये होती. सदर दारू विजय सुरेश शेडमाके याची असून आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. पकडलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
या परिसरात दारू तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आष्टी पोलिसांनी दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलांनी केली.