१३ ग्रामपंचायतीच्या कारभारीणी बनल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST2021-02-22T04:26:40+5:302021-02-22T04:26:40+5:30
ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही ...

१३ ग्रामपंचायतीच्या कारभारीणी बनल्या महिला
ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही गावाचा विकास करण्याची संधी माेठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. आरमोरी तालुक्यातील ३२ पैकी २९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार नुकत्याच सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांनी पटकाविले आहे.
उपसरपंच म्हणून १० ग्रामपंचायतमध्ये महिला विराजमान झाल्या आहेत. यामध्ये वासाळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी उज्वला गणेश मंगरे, वघाळाच्या उपसरपंचपदी शिल्पा संदीप अनोले, ठाणेगावच्या उपसरपंचपदी स्नेहा गोपाल भांडेकर, कुरंडीमालच्या उपसरपंचपदी सुनंदा बळीराम मडावी, मानापूरच्या उपसरपंचपदी वैशाली रंजीत खुणे, देऊळगावच्या उपसरपंच पदी वंदना राजेंद्र कामतकर, पळसगावच्या उपसरपंच म्हणून सोनी गणेश गरफडे, चुरमुराच्या उपसरपंच म्हणून मोतन विलास कांबळे, सिर्सीच्या उपसरपंचपदी दर्शना सुधाकर बोबाटे, चामोर्शी(माल) भाग्यशीला मुखरू गेडाम आदी दहा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिलांची निवड झाली आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, वडधा या माेठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्र महिलांच्या हातात आली आहेत. वासाळा, कुरंडीमाल, देऊळगाव, मानापूर, पळसगाव या पाच ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे महिलांनी पटकावली आहेत. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येऊन पडली असून ही जबाबदारी महिला समर्थपणे पार पाडतील यात शंका नाही.
बाॅक्स ......
या महिलांकडे आली गावाची सूत्रे
देऊळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शामादेवी कवळू सहारे, इंजेवारीच्या सरपंच पदी अल्का योगाजी कुकुडकर, डोंगरसावंगीच्या सरपंचपदी सुलभा प्रदीप गेडाम, देलनवाडीच्या सरपंच म्हणून शुभांगी हरिदास मेश्राम, कुरंडीमालच्या सरपंच म्हणून शारदा विनायक मडावी, सायगावच्या सरपंचपदी शीतल संदीप धोटे, वडधाच्या सरपंचपदी प्रिया भास्कर गेडाम, मानापूरच्या सरपंच म्हणून कुंता दुर्गादास नारनवरे, डोंगरगाव(भु)च्या सरपंचपदी छाया भास्कर खरकाटे, पळसगावच्या सरपंचपदी जयश्री त्त्र्यंबक दडमल, वैरागडच्या सरपंच संगीता खुशाल पेंदाम, बोरी(चक) च्या सरपंच पदी ज्योती दुर्वेश कोसरे ग्रामपंचायत मध्ये महिलाची सरपंचपदी वर्णी लागली आहे.