स्त्रीचे सुदृढ आरोग्य हेच कुटुंबाच्या सुंदर जीवनाचे फलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:20+5:302021-05-05T05:00:20+5:30

त्या स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ...

A woman's good health is the result of a beautiful family life | स्त्रीचे सुदृढ आरोग्य हेच कुटुंबाच्या सुंदर जीवनाचे फलित

स्त्रीचे सुदृढ आरोग्य हेच कुटुंबाच्या सुंदर जीवनाचे फलित

त्या स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला सुरक्षेवर आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत प्रमुख साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकात डोर्लीकर होते. यावेळी महिला राज आणि महिला सक्षमीकरण समितीच्या पदाधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. सीमा नागदेवे व प्रा. स्नेहा मोहुर्ले सहभागी होत्या.

याप्रसंगी डॉ. पौर्णिमा चहांदे यांनी शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी जीवनात कायम सकारात्मक दृष्टी जोपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य व्यवस्थित असल्याशिवाय जीवनाचे चक्र निरोगी असू शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी कोविड परिस्थितीत आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. सुनंदा कुमरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सीमा नागदेवे यांनी केला, तर आभार प्रा. स्नेहा मोहुर्ले यांनी मानले. तंत्रसाहाय्य प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कुथे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.

Web Title: A woman's good health is the result of a beautiful family life