पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:27 IST2021-05-28T04:27:13+5:302021-05-28T04:27:13+5:30

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीवरून अहेरीकडे जाणारे अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे वाहन (एमएच-३३- एटी ५६०) हे चालक जयराम दसरू तिमा चालवित ...

A woman on a two-wheeler was injured in a collision with a police vehicle | पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी

पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीवरून अहेरीकडे जाणारे अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे वाहन (एमएच-३३- एटी ५६०) हे चालक जयराम दसरू तिमा चालवित होते. सोनापूर येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिपरिचारिका सुषमा खुशाल दुर्गे चामोर्शी येथे कर्तव्यावर जाण्यासाठी ॲक्टिव्हाने (क्र. एम एच-३३ झेड ३४०४) जात होत्या. त्यांच्या वाहनाला पोलिसांच्या वाहनाची समोरासमोर धडक बसली. त्यामुळे सुषमा दुर्गे यांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले.

या अपघाताची माहिती सोनापूर येथील पोलीस पाटील चंद्रशेखर दुधबावरे यांनी चामोर्शी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी पंचनामा करून पोलिसांच्या वाहनाचा चालक जयराम याच्याविरुद्ध भादंवि कलम ३३७, ३३८, ४२७ सह १८४ अन्वये गुन्हा नोंदविला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पल्लवी वाघ करीत आहेत.

===Photopath===

270521\img-20210527-wa0207.jpg

===Caption===

पोलीस वाहनाची दुचाकीला धडक दुचाकी चालक गंभीर

Web Title: A woman on a two-wheeler was injured in a collision with a police vehicle