शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

महिला सरपंच व ग्रामसेवकाला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:15 IST

मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केला जात असल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून तिथे उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला.

कुरखेडा (गडचिरोली) : मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केला जात असल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून तिथे उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना कुरखेडापासून ५ किलोमीटरवर असलेल्या चिखली गावात मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, चिखली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या चिचटोला येथील आरोपी अरुण फगवा सिंद्राम (३५) याला त्याच्या मुलाच्या शैक्षणिक कामासाठी ग्रामपंचायकडून रहिवासी दाखला हवा होता. त्याने मागील वर्षापर्यंतच्या कराचा भरणा आधीच केला होता. मात्र चालू वर्षाचा कर भरलेला नसल्याने हा कर भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी भूमिका ग्रामपंचायतने घेतली. त्यामुळे तो त्रस्त होता. यातूनच त्याने मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. पुन्हा एकदा दाखल्याची मागणी केली, पण प्रतिसाद मिळत नसल्याने उपस्थित कर्मचाºयांना शिविगाळ करीत काही कागदपत्रे (रेकॉर्ड) उचलून घरी घेऊन गेला. याबद्दल ग्रामसेवक जयगोपाल बरडे व सरपंच तुलसीबाई उईके यांना माहिती मिळाल्यानंतर ते आरोपीच्या शोधात त्याच्या घरी जात असताना वाटेतच तो भेटला.त्याला कागदपत्रांबद्दल विचारले असता स्वत:कडे असलेली कुºहाड सरपंच व ग्रामसेवकावर उगारत त्याने ग्रामपंचायत कार्यालयात येत असल्याचे त्यांना बजावले.काही वेळातच आरोपी अरुण सिंद्राम ग्रामपंचायतमध्ये पोहोचला. यावेळी त्याने एका प्लास्टिक कॅनमध्ये रॉकेल भरून आणले होते. त्याने ते रॉकेल सरपंच व ग्रामसेवकाच्या अंगावर फेकले आणि आगपेटीच्या काडीने पेटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच प्रसंगावधान राखत उपस्थित उपसरपंच, कर्मचारी व गावकºयांनी त्याला अडवत पकडून ठेवले आणि पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला अटक केली.सरपंच तुलसी उईके यांच्या तक्रारीवरून आरोपी सिंद्रामविरूद्ध भादंवि कलम ३०७, ४३८, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार गजानन पडळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय वनकर तपास करीत आहे.