शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

प्रसूत महिलेला सोडले अर्ध्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली.

ठळक मुद्देएटापल्लीवासीयांनी केली मदत : प्रवासामुळे माता व बालकाची प्रकृती खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथील रूग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या गावापर्यंत न सोडता आष्टी येथे अर्ध्यावरच रूग्णवाहिकेने सोडले. बसची वाट पाहून थकलेल्या नवजात बालक व मातेची प्रकृती बिघडली.एटापल्ली तालुक्यातील जांभिया येथील रेश्मा अक्षय गावडे (२१) हिला प्रसुतीकरिता १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गट्टा पीएचसीमध्ये दाखल केले. त्यानंतर तिला रूग्णवाहिकेने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. तिची प्रसुती गुंतागुंती असल्याचे लक्षात आल्यानंतर १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजता सदर महिलेला चंद्रपूर येथील रूग्णालयात रूग्णवाहिकेने रेफर केले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी गावाजवळ कळा येऊ लागल्याने तिला गोंडपिंपरी येथील रूग्णालयात भरती करण्यात आले. पहाटे ३ वाजता रेश्माची नार्मल प्रसुती झाली. २१ ऑगस्ट रोजी तिला सुट्टी देण्यात आली. रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली. जांभियाला जाण्याकरिता ती बसस्थानक परिसरात थांबली होती. तेवढ्या रात्री जांभियासाठी जाणारे बस किंवा खासगी वाहन मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवजात बाळाला घेऊन थांबावे कुठे, या चिंतेतही होती. ही बाब एटापल्ली येथील नागरिकांच्या लक्षात आली. तिला ग्रामीण रूग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी माता व बाळावर उपचार केले. गुरूवारी दुपारी १२ वाजता सदर मातेला रूग्णवाहिकेने घरी सोडण्यात आले.जबाबदार कोण?गोंडपिंपरी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना विचारणा केली असता, दुसऱ्या जिल्ह्यातील प्रसूत मातेला रूग्णवाहिकेने घरापर्यंत सोडता येत नाही. त्यामुळे तिला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात सोडण्याच्या सूचना रूग्णवाहिका चालकाला दिल्या होत्या, असे सांगितले. चालकाला विचारणा केली असता, आपण सदर महिलेला आष्टी रूग्णालयात सोडण्यास तयार होतो. मात्र नातेवाईकांनी आग्रह केल्याने त्यांना आष्टी बसस्थानकावर सोडलो. नातेवाईकांना विचारणा केली असता, चालकानेच आपल्याला बसस्थानकावर उतरविले, अशी माहिती दिली. त्यामुळे यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल