वाकडीत महिलांनी पकडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:53 IST2017-09-24T23:52:44+5:302017-09-24T23:53:05+5:30
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात वाकडी येथील दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांनी सापळा रचून २५ लिटर मोहफुलाच्या दारूसह दुचाकी असा एकूण ४८ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.

वाकडीत महिलांनी पकडली दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात वाकडी येथील दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांनी सापळा रचून २५ लिटर मोहफुलाच्या दारूसह दुचाकी असा एकूण ४८ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली.
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यागेश घारे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तळेगाव कुरखेडा मार्गावर असलेल्या वाकडी येथे दारूबंदी महिला समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र तरीही गौतम कराडे हा आपल्या दुचाकीने दारूची वाहतूक करीत होता. गावातील महिलांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. महिलांच्या या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.