शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरूनही वीज पुरवठा खंडीतच

By admin | Updated: June 8, 2015 02:10 IST

येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास...

वैरागड : येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास वैरागड येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सहा शेतकऱ्यांना एकाच रोहित्रावरून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. यातील सहाही शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीज बिल न भरल्याने त्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने पुढील अडचण टाळण्यासाठी सुधाकर लांजेवार यांनी वीज बिलाचा भरणा केला. वीज बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करून देण्याची मागणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली असता, त्यांनी इतर पाच शेतकरी जोपर्यंत वीज बिल भरत नाही. तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करून देणार नाही, असा भूमिका घेतली आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नाही तर सदर कनिष्ठ अभियंत्याने लांजेवारी यांनीच इतर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची माहिती द्यावी, असे सांगितले. वास्तविक त्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. मात्र वीज बिल वसुलीसाठी अशा पध्दतीने बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाच भरडले जात आहे. वीज बिल भरल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर वीज भरून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)