‘लकी ड्रा’तील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव

By Admin | Updated: March 1, 2016 01:02 IST2016-03-01T01:02:05+5:302016-03-01T01:02:05+5:30

लोकमत सखी मंचच्या नूतनीकरण व सदस्य नोंदणीत गडचिरोली येथे सहभागी ५० सखी सदस्यांमधून लकी ड्रा सोमवारी जिल्हा लोकमत कार्यालयात काढण्यात आला.

Winners of 'Lucky Dry' award winners | ‘लकी ड्रा’तील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव

‘लकी ड्रा’तील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव

लोकमत सखी मंचच्या नूतनीकरण व सदस्य नोंदणीत गडचिरोली येथे सहभागी ५० सखी सदस्यांमधून लकी ड्रा सोमवारी जिल्हा लोकमत कार्यालयात काढण्यात आला. यात साडी बक्षिसाच्या विजेत्या रूपाली दयानंद दुधे ठरल्या. त्यांना बी-फॅशन प्लाझा कपडा बाजारच्या वतीने संचालक मनोज देवकुले यांच्या हस्ते साडी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तर शोभा बांबोळे एलईडी बल्बच्या विजेत्या ठरल्या. त्यांना अरूण इलेक्ट्रिकल्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्सतर्फे संचालक गुरूदेव हरडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सखींनी सदस्य नोंदणीत सहभागी होऊन बक्षिसे जिंकावित, असे आवाहन जिल्हा संयोजिका प्रीती प्रभाकर मेश्राम यांनी केले आहे.

Web Title: Winners of 'Lucky Dry' award winners