भोई समाजाच्या समस्या सोडविणार
By Admin | Updated: January 11, 2015 22:52 IST2015-01-11T22:52:38+5:302015-01-11T22:52:38+5:30
मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू,

भोई समाजाच्या समस्या सोडविणार
मच्छिमार समाजाचा मेळावा : मार्र्कं डादेव येथे पालकमंत्र्यांचे आश्वासन
चामोर्शी : मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू, असे आश्वासन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
गडचिरोली जिल्हा भोई- ढिवर समाज बहुउद्देशीय कर्मचारी कल्याण मंडळाच्यावतीने मार्र्कं डादेव येथे आयोजित उपवर- वधू परिचय मेळाव्यात आत्राम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, महामंडळाचे व्यवस्थापकीय संस्थापक गोकुल मवारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, डॉ. नामदेव मेश्राम, डॉ. दिलीप शिवरकर, संवर्ग विकास अधिकारी शालिकराव धनकर, बी. जे. सातार, वन विकास महामंडळाचे साहयक व्यवस्थापक मोहन मदने, विजय पचारे, तहसीलदार दयाराम भोयर, बाबुराव बावणे, श्रीकृष्ण कावनपुरे, क्रिष्णा नागापुरे, कृष्णा मचार्लावार, नायब तहसीलदार बावणे, मंडळाधिकारी सुभाष सरपे, सरपंच ललिता म्हरसकोल्हे, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, बंडू चिळांगे, बालाजी सोमनकर उपस्थित होते.
समाजाच्यावतीने आत्राम, नेते, होळी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान भोई- ढिवर, केवट, कहार, भनाश, बेस्ता, बेस्तालु, ओडा- ओडेवार, मच्छिमार समाजातील उपवर युवक- युवतींनी परिचय दिला. तसेच गुणवंत विद्यार्थी, संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातार, काशिनाथ दुमाने, संचालन उकंड राऊत, गजानन डोंगरे यांनी केले.