यात्रेकरूंसाठी बसगाड्या देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:34+5:30

सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत तेलंगणा राज्य आहे. तेलंगणातील अनेक लोक सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत असतात. तसेच सिरोंचा तालुक्यातील बरेच लोक दररोज तेलंगणा राज्यात विविध कामासाठी जातात. शिवाय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात रोटीबेटी व्यवहार चालतो. त्यामुळे महाराष्ट्रव तेलंगणातील लोकांचा घनिष्ठ संबंध आहे.

Will provide buses for the pilgrims | यात्रेकरूंसाठी बसगाड्या देणार

यात्रेकरूंसाठी बसगाड्या देणार

Next
ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची माहिती : मेडाराम जत्रेसाठी राहणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा राज्याच्या मुलगू जिल्ह्यात मेडाराम येथे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जत्रा भरणार आहे. या जत्रेसाठी तेलंगणाच्या सरकारी बस डेपोमधून १०० बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयामार्फत यात्रेकरूंसाठी बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत तेलंगणा राज्य आहे. तेलंगणातील अनेक लोक सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत असतात. तसेच सिरोंचा तालुक्यातील बरेच लोक दररोज तेलंगणा राज्यात विविध कामासाठी जातात. शिवाय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात रोटीबेटी व्यवहार चालतो. त्यामुळे महाराष्ट्रव तेलंगणातील लोकांचा घनिष्ठ संबंध आहे.
यापूर्वी सिरोंचा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले नव्हते. त्यामुळे तेलंगणा राज्यातील बसगाड्या नदी सीमेपर्यंत येऊन थांबायच्या. परंतु आता पूल व महामार्ग झाल्याने भूपालपल्ली बसडेपोतून थेट सिरोंचाकडे तेलंगणाच्या बसगाड्या प्रवाशांसाठी सेवा देत आहेत. मेडाराम जत्रेसाठीही जवळपास १०० बसगाड्या या भागात सोडण्यात येणार असून या संदर्भात सिरोंचात बसथांबा देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सिरोंचा नगर पंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सिरोंचाच्या नगरम चौकातील जागेची पाहणी करून खात्री करण्यात आली आहे.

सिरोंचा शहरानजीक राष्ट्रीय महामार्ग व गोदावरी नदीवर मोठा पूल झाल्याने महाराष्ट्र व तेलंगणा असा थेट संपर्क व वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे मेडारामच्या जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील भाविकांची बसगाड्यांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगाराच्या बसगाड्या सोडण्यात येणार आहे. या संदर्भात तेलंगणा बसडेपोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे.
- अशोक वाडीभस्मे,
विभागनियंत्रक, एसटी गडचिरोली

Web Title: Will provide buses for the pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.