ओबीसींसाठी मंत्रालयाची घोषणा होईल काय?
By Admin | Updated: November 29, 2015 02:14 IST2015-11-29T02:14:05+5:302015-11-29T02:14:05+5:30
७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

ओबीसींसाठी मंत्रालयाची घोषणा होईल काय?
हिवाळी अधिवेशनात : येलेकर यांचा सवाल
गडचिरोली : ७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकार ओबीसींसाठी स्वतंत्र विकास मंत्रालयाची घोषणा करणार काय असा सवाल महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष कृती समितीचे संयोजक प्रा. शेषराव येलेकर यांनी शासनाला केला आहे.
प्रा. येलेकर यांनी म्हटले आहे की, राज्यातील विविध संघटनांची गोलमेज परिषद २०१४ मध्ये नागपूर येथे पार पडली. या परिषदेमध्ये मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र विकास मंत्रालयाच्या मागणीचा ठराव पारित करून तशी मागणी राज्य व केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळाने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.