वीर शेडमाके यांचा संघर्ष व इतिहास जिवंत ठेवू

By Admin | Updated: October 24, 2015 01:16 IST2015-10-24T01:16:16+5:302015-10-24T01:16:16+5:30

आदिवासींनी आपल्या जल, जंगल, जमिनीच्या रक्षणाकरिता निरंतर संघर्ष केला आहे.

Will keep alive the struggle and history of Veer Shadmake | वीर शेडमाके यांचा संघर्ष व इतिहास जिवंत ठेवू

वीर शेडमाके यांचा संघर्ष व इतिहास जिवंत ठेवू

गडचिरोलीत कार्यक्रम : मनीष कुंजाम यांचे आवाहन
गडचिरोली : आदिवासींनी आपल्या जल, जंगल, जमिनीच्या रक्षणाकरिता निरंतर संघर्ष केला आहे. साम्राज्यवादाच्या विरोधात आदिवासींनी मजबूतपणे संघर्ष उभा केला आहे व तो संघर्ष आपल्या अधिकारांसाठी कायम आहे. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा संघर्ष व इतिहास आपण नक्कीच जिवंत ठेवू, असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कुंजाम यांनी केले.
गडचिरोली येथे बुधवारी आयोजित वीर बाबुराव शेडमाके शहीद दिन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राज्यध्यक्ष हिरालाल येरमे होते. सत्कारमूर्ती म्हणून कोर्ट चित्रपटाचे कलावंत वीरा साथीदार, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत जनआंदोलनाचे जिल्हा संयोजक माजी आ. हिरामण वरखडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभू राजगडकर, भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रा. नामदेव कन्नाके आदी उपस्थित होते.
यावेळी आदिवासी महासभेच्या वतीने ‘संघर्षही रास्ता’ या स्मरणीकेचे विमोचन करण्यात आले. तसेच वीरा साथीदार यांचा तीर-कमठा व सायकल भेट देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासींनी एकत्र येऊन आपल्या अधिकाराची लढाई तीव्र करावी, असे आवाहन वीरा साथीदार यांनी यावेळी केले. संचालन जगदीश मेश्राम यांनी केले.

Web Title: Will keep alive the struggle and history of Veer Shadmake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.