शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी राजकीय पक्षावर दबाव वाढविणार

By admin | Updated: September 10, 2014 23:39 IST

वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध गैरराजकीय संघटनांनी लढा उभारला आहे. यापुढे जाऊन जनमंच या संघटनेच्यावतीने २० व २१ सप्टेंबरला सिंदखेड राजा ते दीक्षाभूमी अशी ‘विदर्भमुक्ती यात्रा’

गडचिरोली : वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध गैरराजकीय संघटनांनी लढा उभारला आहे. यापुढे जाऊन जनमंच या संघटनेच्यावतीने २० व २१ सप्टेंबरला सिंदखेड राजा ते दीक्षाभूमी अशी ‘विदर्भमुक्ती यात्रा’ काढली जाणार आहे. या यात्रेत गडचिरोलीसह विदर्भातील जनतेने स्वयंस्पूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जनमंचचे संयोजक चंद्रकांत वानखडे यांनी केले.गडचिरोली येथील विश्रामभवना आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जनमंचचे पदाधिकारी प्रकाश इटनकर, जनमंचचे गडचिरोली जिल्हा संयोजक अरूण पाटील मुनघाटे, रोहिदास राऊत, माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला, पांडुरंग घोटेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल खोब्रागडे, बंडू शनिवारे, विवेक चडगुलवार, मोरेश्वर मानपल्लीवार, सोमनाथ पोपट यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची भूमिका विदर्भाबाबत काय आहे, हे मांडण्यास भाग पाडण्यासाठी विदर्भमुक्ती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून जनमाणसामध्ये स्वतंत्र विदर्भाविषयी जनजागृती केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सामूहिक राहणार असून २० सप्टेंबरला सकाळी १० वाजता बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जिजामातेच्या जन्मगावापासून यात्रेला सुरूवात होईल. खामगाव-अकोला मार्गे त्याच दिवशी सायंकाळी अमरावतीला पोहोचेल. २१ सप्टेंबरला सकाळी अमरावतीहून निघून सायंकाळी ५ वाजता नागपूरात व्हेरायटी चौकात पोहोचेल. व्हेरायटी चौक ते रहाटे कॉलनी मार्गे दीक्षाभूमीवर यात्रेचा समारोप होईल. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत वानखडे यांनी या बैठकीत दिली. या यात्रेमध्ये ५०० वाहने सहभागी होतील. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनीही स्वयंस्पूर्तपणे या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे. यात्रेसाठी रथ तयार करण्यात आला असून या रथावर राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा राहणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)