अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:29+5:302021-05-26T04:36:29+5:30

बाॅक्स .... प्रात्यक्षिकासाठी ७११ अर्ज -काही शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे प्रात्यक्षिक करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिले जातात. यासाठी ७११ अर्ज ...

Will I get subsidized seeds, brother? | अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

बाॅक्स ....

प्रात्यक्षिकासाठी ७११ अर्ज

-काही शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे प्रात्यक्षिक करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिले जातात. यासाठी ७११ अर्ज प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना बियाणांबराेबरच खते, कीटकनाशकांचाही पुरवठा केला जाते. कृषी विभाग आपल्या तंत्रानुसार शेती करते.

- मागील दहा वर्षाच्या कालावधीत संशाेधित करण्यात आलेल्या बियाणांवर प्रति किलाे जास्तीत जास्त ५० टक्के किंवा २० रूपये एवढे अनुदान दिले जाते तर १० वर्षापेक्षाही जुने संशाेधित बियाणे असल्यास प्रति किलाे १० रूपये किंवा ५० टक्के एवढे अनुदान दिले जाते. प्रति एकरी धानाचे २५ किलाे बियाणे उपलब्ध करून दिले जाते.

बाॅक्स .....

यंत्रांसाठी ५ हजार ६२३ अर्ज

कृषी विभागामार्फत राेटावेटर, कल्टीवेटर, ट्रॅक्टर आदी प्रकारचे यंत्र अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. यासाठी महाडीबीटी पाेर्टलवरच अर्ज करावा लागते. जिल्हाभरातील ५ हजार ६२३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. लाॅटरी काढून याचा लाभ दिला जाते. याचा लाभ २०२०-२१ या वर्षासाठी अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आत्तापर्यंत दाेन लाॅटरी काढण्यात आल्या आहेत.

बाॅक्स ....

एसएमएस आला तरच मिळणार लाभ

लाॅटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. अशा शेतकऱ्यांच्या माेबाईलवर एसएमएस पाठविला जाते. त्यामुळे अर्ज केलेले शेतकरी एसएमएसची प्रतीक्षा करत राहतात.

बाॅक्स ....

परमिट मिळणार

-ज्या शेतकऱ्यांची अनुदानावर बियाणांसाठी निवड झाली आहे. त्यांना परमिट दिले जाणार आहे. हे परमिट घेऊन संबंधित शेतकऱ्याला ठरवून दिलेल्या कृषी केंद्रामध्ये जायचे आहे.

-परमिटवरील रक्कम अनुदान असून तेवढी रक्कम बियाणे खरेदी करतेवेळी दुकानदाराला कमी द्यायचे आहेत.

- आपला नंबर लागणार काय, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

बाॅक्स .....

काेणत्या याेजनेसाठी किती अर्ज

अनुदानावरील बियाणे - २,२२९

प्रात्यक्षिकासाठी बियाणे - ७११

यंत्र - ५,६२३

बाॅक्स .

अर्ज केलेले शेतकरी काय म्हणतात

महाडीबीटी याेजना अतिशय चांगली आहे. यामध्ये पारदर्शकता आली आहे. मात्र फार कमी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध हाेतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध हाेतील, यासाठी शासनाने अनुदानामध्ये वाढ करण्याची गरज आहे. - चंद्रशेखर बाेबाटे, शेतकरी

महाडीबीटी याेजनेच्या लाभापासून दुर्गम भागातील शेतकरी वंचित राहतात. शहराच्या सभाेवताल असलेलेच शेतकरी अर्ज करून या याेजनेचा लाभ उचलतात. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना या याेजनेची माहितीही पडत नाही. - सुकरू उसेंडी, शेतकरी

Web Title: Will I get subsidized seeds, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.