चार लाख वृक्ष तोडणार व दोन कोटी वृक्ष लावणार
By Admin | Updated: June 20, 2016 01:02 IST2016-06-20T01:02:29+5:302016-06-20T01:02:29+5:30
एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे.

चार लाख वृक्ष तोडणार व दोन कोटी वृक्ष लावणार
विजय वडेट्टीवार यांची शासनावर टीका
गडचिरोली : एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रूपये खर्च करून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. चार लाख वृक्ष तोडायचे व दोन कोटी वृक्ष लावायचे, हा राज्य सरकारचा बनवाबनवी खेळ आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आ. वडेट्टीवार म्हटले आहे की, एक वृक्षाची वाढ होण्यासाठी ३० ते ४० वर्ष लागतात. एफडीसीएमला ३ हजार २०० हेक्टरमधील मोठी झाडे तोडण्याची शासनाने परवानगी दिली आहे. सदर वृक्षतोड थांबवून नंतरच दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम सुरू करावा, असे त्यांनी म्हटले आहे. लागवड केलेल्यांपैकी १० टक्केच वृक्ष जगतात. त्यामुळे लागवडीनंतर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणाची असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)