वन्यजीव सप्ताहनिमित्त वाघांची रॅली :
By Admin | Updated: October 4, 2015 02:12 IST2015-10-04T02:12:50+5:302015-10-04T02:12:50+5:30
१ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वन विभागाच्या मार्फतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

वन्यजीव सप्ताहनिमित्त वाघांची रॅली :
वन्यजीव सप्ताहनिमित्त वाघांची रॅली : १ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वन विभागाच्या मार्फतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आलापल्ली वनविभागाच्या अहेरी परिक्षेत्र कार्यालयातर्फे शनिवारी अहेरी आणि आलापल्ली शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान वाघांचे मुखवटे धारण केलेले तरूण रॅलीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. या सप्ताहादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवावर नि:शुल्क पोस्टर पेंटिंग, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सप्ताह साजरा करण्याच्या कामात अहेरीचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रभाकर आत्राम, अहेरीचे क्षेत्र सहायक चंद्रशेखर तोंबर्लावार यांच्यासह वनपाल,वनरक्षक यांनी सहकार्य केले. या परिसरातील शाळांमधूनही वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाकडून जनजागृती केली जात आहे.