वन विभागाने शोधला वन्यजीवाचा सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:29 IST2018-05-14T00:29:53+5:302018-05-14T00:29:53+5:30
आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय आढळून आला आहे.

वन विभागाने शोधला वन्यजीवाचा सांगाडा
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय आढळून आला आहे.
पाच दिवसांपूर्वी आलापल्ली परिसरात रानगव्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. वन विभागाने दुर्लक्ष केल्याने रानगव्याचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. त्याचबरोबर भामरागड मार्गावर आलापल्लीपासून अर्धा किमी अंतरावर रानगव्याप्रमाणे असलेल्या वन्यजीवाच्या तोंडाचा भाग तसेच निलगायीच्या पायाप्रमाणे एक पाय तुटून पडला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर वन विभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून कवठी व पाय ताब्यात घेतले. सदर कवठी नेमकी रानगव्याची व पाय निलगायीचा आहे काय? हे तपासण्यासाठी हैदराबाद येथे डीएनए टेस्ट केली जाणार आहे. जंगलात आढळलेले पाय व कवठी उपविभागीय वन अधिकारी रवी अग्रवाल यांच्या उपस्थितीत जाळण्यात आले आहे, अशी माहिती आलापल्ली वन विभागातील अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.