खासगी रुग्णालयात पार्किंगची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST2021-04-22T04:37:47+5:302021-04-22T04:37:47+5:30

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनावर ...

Wilderness of parking in a private hospital | खासगी रुग्णालयात पार्किंगची वानवा

खासगी रुग्णालयात पार्किंगची वानवा

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात

आरमाेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जळाऊ लाकडाचा पुरेसा पुरवठा नाही

अहेरी : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वन कायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्याची तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे.

बीएसएनएलची सेवा ठरली कुचकामी

झिंगानूर : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्यावतीने सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात दूरसंचार सेवा दिली जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कव्हरेजची समस्या माेठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भ्रमणध्वनीधारकांचा एकमेकांशी संपर्क हाेत नाही. परिणामी बीएसएनएलची सेवा या भागात कुचकामी ठरली आहे.

लाईनमन नसल्याने ग्रामस्थांची अडचण

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्तीची मागणी

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिले अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

घरपट्टे मिळण्यास हाेताहे विलंब

गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.

फळांच्या दुकानांची तपासणी करा

वैरागड : विविध प्रकारची फळे कृत्रिमरीत्या कॅल्शियम कार्बाईडने पिकविली जात असून अशा फळांची गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. असे फळ खाल्ल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे. पाण्याने धुऊन तसेच कपड्याने पुसून ताजे फळ असल्याचे भासवून अनेकजण त्याची विक्री करीत आहेत.

कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद

धानोरा : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

कोटगुल येथे आयटीआय मंजूर करा

कोरची : कोटगुल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धाेरणाने या शिक्षणाची वाट लागली आहे.

Web Title: Wilderness of parking in a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.