गडचिरोलीत पीएसआयच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:12 PM2020-05-07T17:12:31+5:302020-05-07T18:31:33+5:30

मूलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज गोविंद शिरसाट यांची पत्नी संगीता रिव्हॉल्वरची गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मूलचेरा येथील पोलीस क्वार्टरमध्ये घडली.

, wife of PSI, was shot by a revolver in Gadchiroli district | गडचिरोलीत पीएसआयच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोलीत पीएसआयच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

Next
ठळक मुद्देघरगुती कारण : मुलचेरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज गोविंद शिरसाट यांची पत्नी संगीता यांनी रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हा थरार गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मुलचेरा येथील पोलीस क्वार्टरमध्ये घडला.
ही घटना घडली त्यावेळी पीएसआय शिरसाट काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर त्यांचे आई-वडिल बाजारात गेले होते. पण सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घरीच होती. त्या रिव्हॉल्वरमधून संगीता यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गोळीचा आवाज येताच ठाण्यात असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांनी तिकडे धाव घेत जखमी संगीता यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेतून चंद्रपूरला हलविण्यात आले. कपाळातून शिरलेली गोळी डोक्यातून आरपार गेल्याने संगीता यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र घरगुती कारणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शिरसाट दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.

Web Title: , wife of PSI, was shot by a revolver in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.