रस्ता सुरक्षेसाठी व्यापक जनजागृतीची गरज

By Admin | Updated: January 18, 2016 01:37 IST2016-01-18T01:37:07+5:302016-01-18T01:37:07+5:30

गडचिरोली : २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन

Widespread public awareness of road safety | रस्ता सुरक्षेसाठी व्यापक जनजागृतीची गरज

रस्ता सुरक्षेसाठी व्यापक जनजागृतीची गरज

अभय बंग यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षाविषयक नियमावली भेट
गडचिरोली : गडचिरोली : २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग वाहतूक शाखा गडचिरोलीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षा विषयक नियमावली भेट देण्यात आली.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे, मोटार वाहन निरिक्षक पी. पी. इंगवले, एन. जी. बन्सोडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शिकेचे कौतुक करून रस्ता सुरक्षा विषयक अडचणींवर चर्चा केली. आदिवासी भागामध्ये परवाने वितरित करण्यासाठी शिबिर घ्यावे. वाहन चालक मद्यपान करून मोटार वाहन चालवितात व अपघातात बळी पडतात. याकरिता व्यापक मोहीम घेऊन अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Web Title: Widespread public awareness of road safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.