लसीकरणानंतर ॲण्टिबाॅडीज तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:49+5:302021-07-21T04:24:49+5:30

बाॅक्स ...... नागपुरात हाेते तपासणी गडचिराेली शहरातील लॅबमध्ये ॲण्टिबाॅडीज तपासण्याची सुविधा नाही. नागपूर, मुंबई, पुणे यासारख्या माेठ्या शहरांमध्ये ही ...

Why test antibodies after vaccination? | लसीकरणानंतर ॲण्टिबाॅडीज तपासणी करायची कशासाठी?

लसीकरणानंतर ॲण्टिबाॅडीज तपासणी करायची कशासाठी?

बाॅक्स ......

नागपुरात हाेते तपासणी

गडचिराेली शहरातील लॅबमध्ये ॲण्टिबाॅडीज तपासण्याची सुविधा नाही. नागपूर, मुंबई, पुणे यासारख्या माेठ्या शहरांमध्ये ही सुविधा आहे. गडचिराेली येथील लॅबमध्ये रक्त घेऊन हे रक्त नागपूर येथे पाठविले जाते. याला जवळपास १ हजार ते १५०० रुपये खर्च येतो.

बाॅक्स ....

बिनधास्तपणा वाढण्याचा धाेका आहे

काेराेनाची लस घेतल्यानंतरही साेशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावाच लागत असल्याचे शासनामार्फत सांगितले जात आहे. ॲण्टिबाॅडीज तयार झाल्यानंतर आपल्याला काेराेना हाेणार नाही, असा अतिआत्मविश्वास निर्माण हाेऊन बिनधास्तपणा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे धाेकादायक ठरू शकते.

बाॅक्स ...

ॲण्टिबाॅडीज तपासणीचे काम वैधच

स्वत:च्या शरीरातील ॲण्टिबाॅडीज तपासण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. त्यामुळे ॲण्टिबाॅडीज तपासणी हे वैधच आहे. मात्र तपासणीच्या निकालानंतर बिनधास्तपणा वाढण्याचा धाेका आहे.

बाॅक्स ...

तपासणीचे प्रमाण अतिशय अल्प

याबाबत गडचिराेली शहरातील एका लॅब मालकाला विचारले असता, त्यांच्याकडे आतापर्यंत फक्त तीन ते चार नागरिकांनी ॲण्टिबाॅडीज तपासणीबाबत विचारणा केली. यावरून गडचिराेली शहरात ॲण्टिबाॅडीज तपासणाऱ्या नागरिकांची संख्या अतिशय कमी असल्याचे दिसून येते.

Web Title: Why test antibodies after vaccination?