या वर्षी बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या कमी असली तरी ही गावातील बाहेरून येणाऱ्या नागरिकांना शाळेत काही दिवस विलगीकरण कक्ष उभारून ठेवले तर आरोग्य विभागाला मदत व गावातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यात मदत होऊ शकते. रोज तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे आणि गावातील कामासाठी नागरिक मोठ्या शहरांमध्ये गेलेले आहेत. परत येताच त्यांना विलगीकरण केले तर गावासाठी सोयीचे होईल. ग्रामीण भागात नागरिक एकमेकांच्या रोज संपर्कात येत असतात. असे असताना जर बाहेरून आलेल्यांचे विलगीकरण केले नाही तर रुग्णसंख्या वाढू शकते. आरोग्य विभागावर ताण पडू नये म्हणून प्रशासनाने याबाबत विचार करून तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी तालुक्यातील अभ्यासक व नागरिक यांनी केली आहे. याकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
काेट - लोकांमधील भीती दूर झाली असली तरीही या वर्षी कोरोना नव्या रूपात आहे. भीतीचे कारण नसले तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गावातील शाळेचे क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर केल्यास ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखू शकतो.
शंकर पारधी, ग्रामपंचायत सदस्य, कुरुड