गडचिराेलीच्या नगराध्यक्षांना अपात्र का करण्यात येऊ नये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:34 IST2021-02-07T04:34:06+5:302021-02-07T04:34:06+5:30
गडचिराेली : स्वत:चे वाहन वापरून झालेल्या खर्चाचे प्रतिपूर्ती बिल नगर परिषदेकडून प्राप्त करून घेतल्याप्रकरणी आपल्याला का अपात्र करण्यात येऊ ...

गडचिराेलीच्या नगराध्यक्षांना अपात्र का करण्यात येऊ नये?
गडचिराेली : स्वत:चे वाहन वापरून झालेल्या खर्चाचे प्रतिपूर्ती बिल नगर परिषदेकडून प्राप्त करून घेतल्याप्रकरणी आपल्याला का अपात्र करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नाेटीस नगरविकास विभागाने गडचिराेलीच्या नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांना बजावली आहे. या नाेटीसमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची तक्रार सत्तारूढ भाजपच्याच काही असंतुष्ट नगरसेवकांनी केली होती.
या कारणे दाखवा नाेटीसमध्ये म्हटले आहे की, नगराध्यक्षांचे पती प्रमाेद पिपरे हे स्वीकृत सदस्य आहेत. नगर परिषदेच्या सभेत मत देण्याचा किंवा ठराव मांडण्याचा अधिकार नसतानाही नगर परिषदेच्या कामकाजात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करतात. शासननिर्णयाचा विपर्यास करून त्याचा चुकीचा अर्थ लावून स्वत:चे वाहन वापरून झालेल्या खर्चाचे प्रतिपूर्ती बिल नगर परिषद गडचिराेलीकडून प्राप्त करून घेतले आहे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत बिलाची रक्कम उचल केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी सादर केला आहे. ही बाब महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्याेगिक नागरी अधिनियम १९६५ चे ५५ अ आणि ब चा भंग करणारी आहे. नगर परिषदेच्या अध्यक्ष पदावरून दूर करून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य हाेण्यास किंवा काेणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य हाेण्यास अपात्र का करण्यात येऊ नये? असा मजकूर त्या नाेटीसमध्ये नमूद आहे.
नाेटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा शासनाला सादर करावा, असेही नाेटीसमध्ये म्हटले आहे. या नाेटीसमुळे नगर परिषदेतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेत २५ पैकी २१ सदस्य भाजपचेच आहेत. पण गटबाजीमुळे त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा सुरू आहे.