चामोर्शीचा संपूर्ण विकास करणार

By Admin | Updated: January 10, 2016 01:39 IST2016-01-10T01:39:01+5:302016-01-10T01:39:01+5:30

चामोर्शी शहराचा विकास करण्यासाठीच जनतेने आम्हाला संधी दिली आहे. शहराचा संपूर्ण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे.

The whole development of Chamorshi | चामोर्शीचा संपूर्ण विकास करणार

चामोर्शीचा संपूर्ण विकास करणार

चामोर्शी : चामोर्शी शहराचा विकास करण्यासाठीच जनतेने आम्हाला संधी दिली आहे. शहराचा संपूर्ण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. नगराध्यक्ष म्हणून या कामात आपण कुठेही कमी पडणार नाही. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शासनाच्या योजना राबवू तसेच चवडेश्वरी मंदिर हे शहराचे दैवत असून मंदिराच्या तसेच इतर धार्मिक स्थळांच्याही विकासासाठीही प्रयत्न करू, असे प्रतिपादन चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री पंकज वायलालवार यांनी केले.
येथील चवडेश्वरी मंदिर देवस्थानच्या वतीने सर्व नगसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी होते. उद्घाटन पोलीस निरिक्षक किरण अवचार यांच्या हस्ते झाले. देवस्थानच्या वतीने नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, सभापती विजय शातलवार, सुमेध तुरे, नगरसेवक प्रशांत एगलोपवार, शामराव लटारे, विजय गेडाम, अविनाश चौधरी, सुनिता धोडरे, प्रज्ञा उराडे, कविता किरमे, मंदा सरपे, रोशनी वरघंटे, मंजुषा रॉय, मिनल पालारपवार, स्वीकृत सदस्य वैभव भिवापुरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुमेध तुरे, रोशनी वरघंटे, उपाध्यक्ष राहूल नैताम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला केशव आंबटवार, प्रदीप येलावार, गंगाधर कोेंडुकवार, अनिल येलावार, किशोर कोत्तावार, दिवाकर झलके, मोरेश्वर चलकलवार उपस्थित होते. प्रास्ताविक महेश येलावार तर संचालन व आभार अमर येलावार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The whole development of Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.