देसाईगंजात फ्लायओव्हर कधी हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:14+5:302021-06-06T04:27:14+5:30

बाॅक्स भुयारी पुलानंतरही जड वाहनांचा प्रश्न कायम देसाईगंज शहर रेल्वे क्राॅसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेले आहे. एका भागात रहिवासी ...

When will there be a flyover in Desaiganj? | देसाईगंजात फ्लायओव्हर कधी हाेणार?

देसाईगंजात फ्लायओव्हर कधी हाेणार?

बाॅक्स

भुयारी पुलानंतरही जड वाहनांचा प्रश्न कायम

देसाईगंज शहर रेल्वे क्राॅसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेले आहे. एका भागात रहिवासी असून दुसऱ्या भागात मुख्य बाजारपेठ आहे. शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्वमध्य रेल्वेची लाईन गेल्यामूळे दिवसातून कमीतकमी दहा ते बारा वेळा रेल्वे फाटक पडत असल्याने नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळत रहावे लागत होते. त्या करिता भूमिगत रेल्वे पुलाचा अप्रोच रस्ता असून भूमिगत रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर अधिकतम आहे. यातून केवळ मोटार सायकल, ट्रॅक्टर, टॅक्सी, कार मार्गक्रमण करू शकते. माेठ्या व अवजड वाहनांना मात्र यातून प्रवेश नाही.

काेट

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला रेल्वे क्रॉसिंग असते त्या त्या ठिकाणी उड्डाणपुलाची तरतूद असतेच. परंतु सध्यातरी वडसा रेल्वेवरून जाणाऱ्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळालेली नाही.

संजीव जगताप, उप कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय भंडारा

Web Title: When will there be a flyover in Desaiganj?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.