शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

धानाचा बाेनस कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत आधारभूत किमतीने धान खरेदी केले जाते. यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये तर चांगल्या प्रतीच्या धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८८८ रुपये एवढी आधारभूत किंमत जाहीर केली. त्याचबराेबर खरिपाच्या धानासाठी प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे. 

ठळक मुद्देखते, बियाणांसाठी काढावे लागतेय कर्ज; चार महिन्यांचा कालावधी उलटूनही रक्कम मिळेना

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही खरिपाचे धान विकलेल्या शेतकऱ्यांना बाेनसची रक्कम मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी धान विकून आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. तरीही बाेनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बाेनसची रक्कम कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत आधारभूत किमतीने धान खरेदी केले जाते. यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये तर चांगल्या प्रतीच्या धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८८८ रुपये एवढी आधारभूत किंमत जाहीर केली. त्याचबराेबर खरिपाच्या धानासाठी प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळामार्फत ५६ हजार ९८९ शेतकऱ्यांकडून १६ लाख ६१ हजार ७६० क्विंटल धान खरेदी केले. या धानाची किंमत ३१० काेटी ४१ लाख ६७ हजार ९२२ रूपये एवढी हाेते. त्यावर पुन्हा प्रति क्विंटल बाेनस द्यायचा आहे. बाेनसची रक्कम ११६ काेटी ३२ लाख ३२ हजार एवढी हाेते. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या खात्यात १८६८ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे धानाची रक्क्म जमा केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी धानाच्या बाेनसची रक्कम दिली जाते. खरिपाचे धान ३१ मार्चपर्यंतच खरेदी केले जातात. त्यानंतर धान खरेदी बंद केली जाते. हिशेब पूर्ण झाल्यानंतर बाेनसची रक्कम जवळपास मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात हाेती. यावर्षी मात्र जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना अजूनही बाेनची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. 

शेतीसाठी उपयाेगात आला असता पैसाशेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणी, किटकनाशके खरेदी करावी लागतात. तसेच शेतीच्या मशागतीसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याने त्याला पैशाची गरज राहते. अशावेळी धानाच्या बाेनसची रक्कम मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून हाेता. मात्र, अजूनही बाेनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कर्ज काढावे लागत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बाेनसची रक्कम जमा झाली हाेती. यावर्षी मात्र अजूनही रक्कम मिळाली नाही. 

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान ५० क्विंटल धान खरेदी केले जाते. त्या धानाची  ७०० रुपये प्रमाणे ३५ हजार रुपये एवढी रक्कम हाेते. एवढी रक्कम मिळाली असती तर कर्ज काढण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली नसती. 

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड